15.2 C
New York
Saturday, May 18, 2024
Star Media News
Breaking News
Election News

विकासाची परंपरा मी जपणार माझे मत सुनिल प्रभूंनाच देणार – भूषण चव्हाण

पूर्वीच्या काळी राजाचे साम्राज्य पसरवण्यासाठी सैन्याचा सरदार प्रबळ असणे आवश्यक होते. तर लोकशाहीच्या राज्यात आपण सर्वसामान्य मतदार राजे असून आपले स्थानिक प्रश्न, आपल्या समस्या सरकार दरबारी मांडण्यासाठी, आपल्यासाठी महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक आक्रमक सरदार निवडण्याची गरज असते. आणि आपण कुरार, दिंडोशी वासीयांनी आधीच ठरविले आहे की, जनसामान्यांचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे सुनिल प्रभूच पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सरदार  असणार आहेत, सुनिल प्रभूच माझे आमदार असणार आहेत!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या उतारावर वसलेला दिंडोशी विधानसभा मतदारसंघ म्हटला तर डोळ्यासमोर येतात त्या एका बाजूला असलेल्या टोलेजंग इमारती तर दुसऱ्या बाजूला नागरी निवारा भागात राहणारे उच्चमध्यमवर्गीय. एक बाजूला झोपडपट्टी मध्ये राहणारे मध्यमवर्गीय तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन जमिनीवर राहणारे आपले बांधव. अशा विरोधाभासी विविधतेने बनलेल्या या मतदारसंघाच्या मागण्या देखील विविध आहेत.

सुनिल प्रभू साहेबांना २०१४ साली आपण सर्वांनी भरघोस मतांनी निवडून दिले आणि आपण सर्वांनीच अनेक वेळा न्यूज चॅनेल वरून पाहिले आहे की, खऱ्या अर्थाने कुरारवासीयांचा आवाज विधानसभा सभागृहात पोहोचला, दिंडोशीवासीयांच्या समस्या सरकार दरबारी मांडल्या जाऊन त्यासाठी विविध संसदीय आयुधांच्यावापरासह पाठपुरावा सुरू झाला.

वाहतूक कोंडी ही कुरारची महत्वाची समस्या होती, प्रभू साहेबांनी अगदी पहिल्या अधिवेशनातच ही समस्या मांडून त्यावर तोडगा सुचविला, त्या अनुषंगाने आज मितील रहेजा वसाहत व टाईम्स ऑफ इंडिया येथील जनतेसाठी फ्री यु निर्माण झाला, नर्मदा हॉल येथील बॉटल नेक निघाल्याने वाहतूक जलद झाली आहे, कुरार भुयारी मार्गाचा विकास काम सुरू असल्याने लवकरच अप्पापाडा ते रेल्वे स्थानक वाहतूक दोन टप्प्यात ना होता एकाच टप्प्यात होणार आहे. या सह अनेक रस्त्यावरील अतिक्रमणे हटवल्याने वाहतूक जलद होत आहे. हुमेरा पार्क येथिल रस्ता देखिल लवकर विकसित होणार असून त्यामुळे एक पर्यायी मार्ग तयार होत आहे, कांदिवली लोखंवाला ते रत्नागिरी हॉटेल येथिल प्रस्तावित विकास नियोजन विकसित करण्याचे काम देखिल सुरू आहे.

तसेच दिंडोशी मधिल विद्यार्थ्यांसाठी एक अत्याधुनिक वाचनालय व अभ्यासिका मिळावी ही युवा वर्गाची मागणी होती, आज स्व.अविनाश साळकर वाचनालय व अभ्यासिका उभे असून याचा फायदा सर्व प्रकारचे शिक्षण घेणाऱ्या युवा वर्गासह स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांना देखिल होत आहे. आज मितील स्व. मीनाताई ठाकरे उद्यान, महंत बालकदासजी उद्यान, या सारख्या उद्यानांसह सुनिल प्रभू यांनी अनेक सोसायट्यांच्या उद्याने देखिल सुशोभित केली असून यांचा फायदा आपल्या सर्वांना होत आहे. तर बुवा साळवी मैदानाच्या बाजूचा भूखंड मैदानी खेळा करिता महापालिके मार्फत उपलब्ध करून दिला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या कपारीवर वसलेल्या या मतदारसंघात खरी गरज आहे ती दरड कोसळली जाऊ नये या करता संरक्षण भिंती उभारण्याची आज सुनिल प्रभू साहेबांच्या पाठपुराव्यामुळे जागोजागी संरक्षण भिंती उभारल्या गेल्या आहेत.

वन विभागातील जनतेला वीज, पाणी, शौचालय इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत.

उंचावर वसलेल्या कुरार गावाला मुबलक पाणी देण्यासाठी ३६ इंच व्यासाच्या जलवाहिनी सह अनेक ठिकाणी गरजे नुसार जलवाहिन्यांचे जाळे उभारण्यात आले असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

२०१४ साली सुनिल प्रभू साहेबांनी दिलेली “माझे कुरार, निर्भय कुरार!” घोषणा सत्यात उतरत असून कुरार मधिल महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून याचे थेट प्रक्षेपण पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे, परिणामी सरकारी आकड्यांनुसार कुरार मधिल गुन्हेगारी प्रमाण घटले आहे. विधानसभा क्षेत्रात उभारण्यात आलेल्या पोलिस बिट चौक्यांमुळे गुन्हेगारांच्या मनात जरब निर्माण झाली आहे. व गुन्हेगारी प्रमाण घटत आहे. तसेच प्रस्तावित विकास नियोजन आराखड्यात कुरार पोलीस ठाण्याच्या जागेवरील उद्यान हे आरक्षण बदलून तेथे पोलीस ठाणे आरक्षण झाल्याने लवकरच सुसज्ज पोलीस ठाणे उभे राहणार आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर तलावाची देखभाल म्हाडाकडून होत नसल्याने तलावातील पाणी खराब होऊन दुर्गंध येत असल्याने गणेश भक्त विसर्जनासाठी नाखूष होते. सुनिल प्रभू साहेबांच्या पाठपुराव्या मुळे आज सुशोभित तलाव आपल्या सर्वांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण बनला आहे.

पोईसर नदीपात्र विकासात बाधित घरांचे पुनवर्सन मालाड पूर्व येथे २६९ चौरासफुटांच्या सदनिकां मध्ये करण्यात यावे अशी मागणी सुनिल प्रभू यांनी २०१४  पासून शासन दरबारी लावून धरली, परिणामी आज येथिल बधितांचे पुनर्वसन कुरारमध्येच करण्यात येत आहे

आज रेशनिंग कार्यालयातील कोणतेही काम करण्यासाठी अथवा महापालिकेतील कोणतेही काम करण्यासाठी मालाड पश्चिम येथे जावे लागते पण प्रभू साहेबांच्या अथक पाठपुराव्यामुळे रेशनिंग कार्यालयाला मंजुरी मिळाली असून महापालिका कार्यालयास ददेखील लवकरच मंजुरी मिळणार आहे.

सुनिल प्रभूंच्या अथक पाठपुराव्यामुळे मालाड पूर्व येथील त्रिवेणी नगरमधील दिव्या अपार्टमेंटमध्ये मालाडमधील रुग्णांसाठी मुंबई महापालिकेच्यावतीने हेमोडायलेसीस केंद्रे उभारणार आहे. या केंद्रात १६ डायलेसीस मशीन उपलब्ध असणार असून अवघ्या ३५० रुपयांमध्ये डायलेसीसचा उपचार मिळणार आहेत यामुळे कुरार मधिल किडनी रोग रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून काम करत असताना सुनिल प्रभु यांनी, आधी दिल्या गेलेल्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात यावे याकरता आमदार सुनिल प्रभू यांनी विधानसभा सभागृहात जोरदार मागणी केली सोबतच मुस्लिम व धनगर जनतेला आरक्षण मिळावे अशी मागणी देखिल केली. तसेच सरसकट कर्जमाफी व्हावी या करता देखील सुनील प्रभू यांनी आपला आवाज उठवला. विद्यार्थ्यांचे प्रश्न विधानसभा सभागृहात मांडले, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ व्हावी अशी मागणी केली.

अशा आपल्या एक ना अनेक समस्या शासन दरबारी मांडून आपला सर्वसामान्य जनतेचा आवाज सरकारच्या कानात पोचवीण्याचे खरे काम सुनिल प्रभू यांनी मागील पाच वर्षांत केले आणि म्हणूनच या लोकशाहीच्या राज्यात विकासाची परंपरा मी जपणार असून मी माझे मत सुनिल प्रभू यांनाच देणार असून….

जन सामान्यांनाचे सरदार…
सुनिल प्रभू माझे आमदार!

Related posts

सलवाव के घनश्याम विद्यामंदिर में एक मतदान केंद्र की प्रतिकृति बनाई गई और छात्रों को मतदान के प्रति जागरूक किया गया।

cradmin

दमन में किस पर सजेगा ताज , सस्पेंस बरकरार

starmedia news

 जिला निर्वाचन अधिकारी श्रीमती क्षिप्रा आग्रे ने चुनाव संबंधित कार्यों के प्रशिक्षण में विशेष रूप से उपस्थित होकर जोनल आफीसरों का मार्गदर्शन किया। 

cradmin

Leave a Comment