अविनाश साळकर फाऊंडेशन (प्रतिष्ठान) रजि.कुरार गांव मालाड पूर्व या संस्थेच्या माध्यमातून आंतशालेय क्रीडा महोत्सवातंर्गत कबड्डी स्पर्धेचे आयोजन आज दि,१४ डिसें.व १५ डिसेंबर २०१९ हे दोन दिवसांसाठी करण्यात आले आहे. अविनाश साळकर फाऊंडेशन हि संस्था मागीली ४ वर्षे अशा सलग या स्पर्धांचे आयोजन करत असून या ५ व्या वर्षी तब्बल दिंडोशी, गोरेगाव, मालाड, व कांदिवली परिसरात या स्पर्धांचा प्रसार व प्रचार होता आज या साली २२ शाळांचे संघ सहभागी होत आहे. कब्बडी हा मराठमोळा मातीतला खेळ दिंडोशी विधान सभा क्षेत्रात अधिक फोपावत जावा मुलांच्या या क्रीडागुणांना वाव मिळावा म्हणून संस्था सतत प्रयत्नशील आहे.
आजच्या या स्पर्धेचा उद्घटन सोहळा शिवसेना आमदार, विभाग प्रमुख, माजी महापौर सुनिल प्रभु यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी बृन्हमुंबई म न पा चे उपमहापौर सुहास वाडकर, विधान सभा संघटक विष्णू सावंत, उपविभाग प्रमुख गणपतराव वारिसे, स्थानिक नगरसेवक आत्माराम चाचे शाखाप्रमुख राजेंद्र घाग, विजय गावडे जिजामाता शिक्षण संस्थेचे कार्यकारी सदस्य मान श्री सचिन कदम, अविनाश साळकर यांचे पिताश्री तात्या साळकर, संस्थेच्या अध्यक्षा अनघा साळकर व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सदर स्पर्धा स्ट्रीट स्पोर्टस् लायव्हू या युटूब प्रचार वाहिनीवर दाखविण्यात येणार असून पूर्ण सामने घर बसल्या कबड्डी रसिकांना पाहता येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा अनघा साळकर यांनी दिली.