13.5 C
New York
Sunday, Dec 3, 2023
Star Media News
Breaking News
News

दिंडोशीतील क्रांती नगर भागातील दोन हजार घरांना ऑनलाईन पंपा द्वारे पाणी पुरवठा- शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश. 

मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) – दिंडोशी विधानसभा प्रभाग क्र. ३९ मधील क्रांतीनगर परिसरातील गणेश चाळ कमिटी, बहुजन हिताय बहुजन सुखाय चाळ, अजिंक्यतारा चाळ, राहुल चाळ, पंचशील चाळ, नटराज चाळ या उंचावरील भागामधील २ हजार घरांना दिलासा मिळणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार्‍या या जल योजनेच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.

दिंडोशीतील हा भाग उंचावर असल्याने आणि या भागातील वाढत्या लोकसंख्येमुळे क्रांतीनगरमधील सुमारे २ हजार घरांना पाणी पुरवठा होत नव्हता. या पार्श्वभूमीवर तत्कालीन शिवसेना नगरसेविका विनया सावंत यांनी सदरहू बाब आमदार सुनील प्रभू यांच्या कडे व्यक्त केली. शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्या मार्गर्शनाखाली आमदार सुनिल प्रभु व विनया सावंत यांनी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त ( प्रकल्प) उपायुक्त तसेच जल अभियंता व नियोजन विभागाकडे तसेच पी उत्तर विभाग कार्यालयात सतत सातत्याने पाठपुरावा करून अर्थ संकल्पात तरतूद करून घेतली व आज काम सुरू झाले. यासाठी सहायक जल अभियंता संतोष संखे यांनी पाणी पंपाद्वारे विशेष प्रयत्न केले.

दरम्यान, ही योजना कार्यावित झाल्यानंतर पंपाच्या बिजेचे बिल व कामकारांचे मानधन महानगरपालिका देणार आहे. तर पंपरूमचे भाडे नागरिकांना समन्वय कमिटीकडून द्यावे लागणार आहे. रहिवाशांना पाच लोकांचा समूह केल्यानंतर ही जलजोडणी मिळणार आहे. सदर जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी नगरसेविका विनया सावंत, विष्णू सावंत, विधानसभा संघटक, प्रदीप निकम, उपविभाग प्रमुख क्रांतीमोहन मिश्रा, संघटक सोपान राजूरकर, उपविभाग समन्वयक दिलीप तळेकर, सह. उपविभाग समन्वयक रमेश वळंबे, शाखा प्रमुख योगिता धुरी, पुष्पा मिश्रा आदी उपस्थित होते.

पाणीप्रश्न लवकरच सुटणारा- हा पंपरूम बनविण्यासाठी दोन रूम भाड्याने घेऊन पंपरूम बनविण्यात आला आहे. पंपरूमचे काम पूर्ण झाले आहे. आता उपरोक्त प्रत्येक चाळ कमिटीमध्ये ४ इंच व्यासाची जल वाहिनी जोडण्यासाठीचे काम सुरु करण्यात आले.  यासाठी क्रांतिनगर परिसरातील उंच भागावरील नागरिकांसाठी ऑनलाईन पंपयोजना व त्यासाठी लागणार्‍या ७००० मीटरची पाईपलाईन लुपिंग स्वरुपात जोडण्यात आली. ही जलवाहिनी जोडणी झाल्यानंतर पाणी दोन महिन्यांत पाणी पुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.

Related posts

कामगार नेता अशोक जाधव बने एम. एम. यू. के अध्यक्ष। 

cradmin

वापी को मिली सौगात, एनजीटी के आदेश के बाद वापी जीआईडीसी में लगेंगे 10 एमएलडी के दो सीवरेज ट्रीटमेंट प्लांट। 

cradmin

जिला पंचायत अध्यक्ष मनहरभाई पटेल की अध्यक्षता में पंचगव्य शिविर का आयोजन

starmedia news

Leave a Comment