दिंडोशी विधानसभा क्षेत्रात प्रभाग क्रमांक ३८ मधिल सईबाई नगर, महाराष्ट्र नगर, प्रथमेश नगर या उंचावरील भागात लोकसंख्या वाढल्याने अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या मागील तीन वर्षांपासून येथील नागरिकांना भेडसावत होती. या भागात पुरेसा पाणीपुरवठा व्हावा याकरिता येथील नागरिकांनी आमदार सुनील प्रभू यांच्याकडे अशी मागणी केली व निवडणूकीनंतर या कामाची सुरुवात केली जाईल असे आश्वासन आमदार सुनिल प्रभु यांनी येथिल नागरिकांना दिले होते त्या नुसार मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीचा पाठपुरावा स्थानिक शाखाप्रमुख विजय गावडे उपविभाग प्रमुख प्रदीप निकम तसेच स्थानिक नगरसेवक चाचे यांनी आमदार सुनील प्रभू यांच्यासोबत महापालिकेच्या संबंधित विभागासोबत सतत सातत्याने करून मंजुरी मिळवली आणि आज सईबाई नगर येथे चार इंच व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ झाला असून यामुळे येथील तब्बल ३००० पेक्षा जास्त नागरिकांना फायदा होणार आहे. तर प्रथमेश नगर येथे सहा इंच व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार असून येथील सुमारे १००० कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. तर महाराष्ट्र नगर येथे देखिल सहा इंच व्यासाची नविन जलवाहिनी टाकली जात असून यामुळे या परिसरातील ३००० पेक्षा जास्त राहिवाश्यांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.
आज या तिन्ही ठिकाणी नविन जलवाहिनी टाकण्याच्या कामाची सुरुवात आमदार, विभाग प्रमुख, माजी महापौर मुंबई सुनिल प्रभु यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी विधानसभा संघटक विष्णू सावंत, उपविभाग प्रमुख प्रदीप निकम, नगरसेवक आत्माराम चाचे, नगरसेविका विनया सावंत, शाखा प्रमुख विजय गावडे, शाखा संघटक विद्या खानविलकर, समन्वयक मनोहर राहटे, सरला पांचाळ, अंकिता चिकटे, ऍड. शिवा पंडित सर्व उपशाखा प्रमुख इतर पदाधिकारी व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.